नाशिक : इगतपुरीत गुटख्याने भरलेले दोन कंटेनर जप्त; एक कोटी २५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात | पुढारी

नाशिक : इगतपुरीत गुटख्याने भरलेले दोन कंटेनर जप्त; एक कोटी २५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात

इगतपुरी (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकहून मुंबईला अवैध गुटखा घेऊन जात असलेले दोन कंटेनर इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन कंटेनरसह जवळपास एक कोटी २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी नाशिक मुंबई महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस अधिक्षक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस हवालदार किशोर खराटे, चेतन सवस्तरकर, दिपक अहिरे इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन देसले, मुकेश महिरे, राहुल साळवे, विजय रुद्रे, अभिजीत पोटींदे, गिरीश बागुल, विनोद टिळे, निलेश देवराज यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील प्रिंप्रीसदो चौफुलीवर सापळा लावुन नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन कंटेनरची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.

पोलिसांनी दोन कंटेनर मधील ८० लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला असून यात 4KSTAR, SHK या कंपनीचा गुटखा पकडला आहे. यासह दोन कंटेनर (वा.क्र. एचआर ३८ झेड ३९३७) व (वा.क्र. एचआर ४७ ई ९१४०) जप्त करण्यात आले आहे. असे एकूण १ कोटी २८ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत चालक सलमान अमीन खान (वय ३०) व इरफान अमीन खान (वय ३१, रा. जि. पलवल, हरियाणा) या दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडेसह पोलीस पथक करीत आहे.

अधिक वाचा :

Back to top button