Cameron Green : सूर्यकुमारसोबत फलंदाजी करणे सर्वात सोपे काम : ग्रीन | पुढारी

Cameron Green : सूर्यकुमारसोबत फलंदाजी करणे सर्वात सोपे काम : ग्रीन

मुंबई;  वृत्तसंस्था : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबईला सुरुवातीला चांगली कामगिरी करता आली नव्हती मात्र अखेरच्या टप्प्यात कामगिरी उंचावत त्यांनी क्वालिफायरपर्यंत मजल मारली. मुंबईच्या या प्रवासात कॅमरुन ग्रीनचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. कॅमरुन ग्रीनने सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Cameron Green)
कॅमरुन ग्रीनने स्टार स्पोर्टसशी बोलताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्या बद्दल भाष्य केले. सूर्युकमार यादववर कौतुकाचा वर्षाव करताना ग्रीन म्हणाला की सूर्यकुमार यादव सोबत काम करणे हे जगातील सर्वात सोपे काम आहे. (Cameron Green)
रोहित शर्माबद्दल बोलताना ग्रीन म्हणाला की रोहित शर्माला भारताकडून आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आयपीएलमध्ये मुंबईने त्यांचा पहिला सामना कधीच जिंकलेला नाही हे त्याने सांगितल्याचे ग्रीन म्हणाला. आपली सुरुवात हळू हळू झाली असली तरी योग्य वेळी आपण सर्वश्रेष्ठ कामगिरी करत असल्याचे रोहितने सांगितल्याचे ग्रीन म्हणाला.

हेही वाचा; 

Back to top button