छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, वाहनावरिल ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गवरील अपघातांची मालिका थांबायला काही तयार नाहीये. गुरुवारी (दि.२६) सख्या तीन भावांडाच्या अपघाती मृत्यूची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना ताजी असतानाच गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील डोणगाव येथे शुक्रवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना वाहनवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील विनय सातपुते (वय ३३) या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती देताना समृद्धी महामार्गवरील सुरक्षा पर्यवक्षक कृष्णा बडे यांनी सांगितले की सदर अपघात डोणगाव येथे घडला. QRV टीमने तात्काळ अपघातग्रस्त गाडीमधील जखमी व्यक्तीना रुग्णवाहिकेतून घाटी हॉस्पिटलला तात्काळ हालवले होते. अपघातग्रस्त गाडीमालक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गाडी क्रमांक MH 13 AN 9026 (टेम्पो 407) वैजापूरवरून जालन्याकडे जात असताना डोणगाव येथे ओव्हरटेक करत असताना अपघात झाला आहे.
हेही वाचंलत का?
- Virendra Sehwag : वीरेंद्र सेहवाग झाला आकाश मधवालचा फॅन
- Akash Madhwal : आकाश मधवालवर स्थानिक स्पर्धेत बंदी घातली होती