नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके | पुढारी

नाशिक : ग्रामीणमधील अवैध धंदे रोखण्यासाठी आता १२ पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण हद्दीतील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र १२ पथके तयार केली आहेत. नव्याने तयार केलेली ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत. या पथकांमध्ये एकूण ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक ग्रामीणच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिस प्रयत्नशील आहेत. यासाठी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस ठाणे प्रभारींना त्यांच्या हद्दीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अवैध धंदे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील केली आहे. जिल्ह्यातील महामार्गावरील अवैध मद्यविक्री, हॉटेल, गावठी दारूचे अड्डे व इतर अन्य अवैध धंद्यांवर कारवाई झाली. मात्र, अद्याप जिल्ह्यातील काही पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे, चाेऱ्या सुरूच आहेत. त्यामुळे या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी १२ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. कारवाई करताना ही पथके स्थानिक पाेलिसांना काेणतीही माहिती देणार नाही. कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पाेलिसांना कळविले जात आहे.

पथकांची रचना

प्रत्येक पथकात एक सहायक किंवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. एक महिला अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे दाेन अंंमलदार, पोलिस मुख्यालयातील दाेन अंमलदारांचे पथक राहणार आहे. ही पथके कार्यक्षेत्रात गस्त घालत किंवा माहिती मिळाल्यास अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button