

पुढारी ऑनलाइन डेस्क : सातत्य, कष्ट आणि माहेर-सासरच्या पाठिंब्याने मी आज यशाला गवसणी घातली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून नगरपालिका मुख्याधिकारीपदी (Assistant commissioner of muncipal corporation) निवड झालेली ऐश्वर्या नाईक-डूबलची ही प्रतिक्रिया आहे. ऐश्वर्या मूळची हळदी (ता.करवीर) गावची. सध्या ती नोकरीनिमीत्त सांगली येथे वास्तव्यास आहे. पहिल्या प्रयत्नात तिने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदावर तिने यश मिळविले होते. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली. आता तिची नगरपालिका मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे. पुढारी ऑनलाईन टीमशी संवाद साधत असताना ती म्हणाली " सातत्य, कष्ट आणि माहेर-सासरच्या पाठिंब्याने यश मिळवले. जाणून घेऊया तिच्याकडून तिच्या यशाबद्दल. ( MPSC Result)
राज्य सेवा (MPSC) २०२१ परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी (दि.२५) जाहीर झाला. यामध्ये ऐश्वर्या जयसिंग नाईक-डुबल, (रा. हळदी, ता. करवीर, सध्या रा. कराड) हिची नगरपालिका मुख्याधिकारीपदी (Assistant commissioner of muncipal corporation) निवड झाली आहे.
पदवीपासूनच ऐश्वर्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. तिने ठरवल होतं मला प्रशासकीय सेवेत जायचं आहे. त्यामुळे पदवीचा अभ्यास करत स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासालाही सुरुवात केली. पुढारी ऑनलाईन'टीमसोबत बोलत असताना ऐश्वर्या म्हणाली,"सातत्य, नियोजन आणि आई-बाबांचा पाठिंब्याने मी हे माझे स्वप्न पूर्ण केले, बाबांची ईच्छा होती की सेट परिक्षाही द्यावी. कोरोना काळात परिक्षांना विलंब झाला त्या काळात अर्थशास्त्र विषयातून सेट परिक्षा पास झाले. ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक, तर आई गृहिणी आहे. प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाल्यावर तिने कोल्हापुरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली. घरात खेळाचे वातावरण. ऐश्वर्या उत्कृष्ट अॅथलेटिक्स व स्विमिंगमधील राष्ट्रीय खेळाडू देखील आहे.
पुढे बोलत असताना तिने आपल्या सासरच्या कुटूंबियांनाही आपल्या यशाचे श्रेय दिले. ती म्हणाली की, लग्नानंतर पती संग्राम डुबल (मंत्रालय कक्ष अधिकारी) यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन मिळाले. तसेच सासरे उदयराव डुबल (DYSP ), WRSF क्लबचे अभिजीत मस्कर, अश्लेष मस्कर, भोगावती कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन हंबीरराव पाटील, गोखले कॉलेजचे सचिव मा. जयकुमार देसाई यांचेही मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा