अंडी घालणारा सस्तन प्राणी आणि तोही चक्क सफेद! | पुढारी

अंडी घालणारा सस्तन प्राणी आणि तोही चक्क सफेद!

सिडनी ः अंडी घालणारा सस्तन प्राणी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर प्लॅटिपसच येतो. मात्र, केवळ प्लॅटिपसची मादीच अंडी घालते असे नाही. दुसराही एक सस्तन प्राणी असाच अंडी घालणारा आहे. त्याचे नाव आहे इचिड्न. प्लॅटिपस आणि इचिड्न हे दोनच असे सस्तन प्राणी आहेत ज्यांच्या माद्या अंडीही घालतात आपि पिल्लांना दूधही पाजवतात. आता अशाच एका अल्बिनो इचिड्नला कॅमेर्‍यात टिपण्यात ऑस्ट्रेलियामध्ये यश आले आहे.

छोट्या चोचीचे इचिड्नाला शास्त्रीय भाषेत ‘टाचिग्लोसस अ‍ॅक्युलेटस’ असे नाव आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीमध्ये हे प्राणी आढळतात. लांब चोचीचे इचिड्न केवळ न्यू गिनीमध्येच आहेत. आता ऑस्ट्रेलियात चक्क अल्बिनो म्हणजेच सफेद इचिड्न दिसून आला आहे. त्याची छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कारच्या धडकेने हा इचिड्न किरकोळ जखमी झाला होता. बाथुर्स्ट परिसरातील रस्त्यालगत हा प्राणी दिसून आला. संशोधकांनी सांगितले की या दुर्बिळ अल्बिनो इचिड्नला ‘मि. स्पाईक’ असे नाव देण्यात आले आहे.

त्याला ‘रेस्क्यू अँड एज्युकेशन सर्व्हिस’च्या देखभालीत सोडण्यात आले. सुदैवाने त्याला केवळ किरकोळ दुखापत झालेली आहे. ज्यावेळी शरीर मेलानिन पिग्मेंटस् किंवा रंगद्रव्यांची निर्मिती करीत नाही त्यावेळी असे ‘अल्बिनो’ किंवा सफेद प्राणी बनतात. ऑस्ट्रेलियात अकरा दिवसांपूर्वीच असाच एक सफेद इचिड्न दिसून आला होता. याचा अर्थ अकरा दिवसांच्या काळात तिथे दोन सफेद इचिड्न आढळले आहेत.

Back to top button