

कांद्याने किरकोळ दरात ( onion prices ) ४० रुपये किलोचा भाव ओलांडताच केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने बफर स्टॉक दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदिगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यास सुरवात केली आहे.
१२ ऑक्टोबर रोजी लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ३७०० रुपये क्विंटलने भाव होता तर दि २० ऑक्टोबर रोजी कांदा सरासरी २७०० रुपये क्विंटलने विक्री होत ( onion prices ) आठ दिवसात १ हजार रुपयांची मोठी घसरण पहायला मिळाली.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाच्या आदेशाने ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील किंमती देशव्यापी सरासरीपेक्षा जास्त आणि मागील महिन्यांपेक्षा अधिक वधारत असतील, अशा ठिकाणी रास्त भावात कांदा पाठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारताचा चांगल्या दर्जाचा कांदा असतांनाही भाव वाढत असल्याने कांदा निर्यात अगदी नगण्य होत आहे.
भारतामध्ये देशांतर्गत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने निर्यातीचा वेग मंदावला आहे. दुबईसह अरब राष्ट्रांमध्ये सध्या तुर्कस्थान, इजिप्त अन् पाकिस्तानच्या कांदा मोठ्या प्रमाणत आयात होत आहे.आपल्याकडे निर्यातीचे दीर्घ कालीन धोरण नसल्याने परकीय बाजारपेठ गमावण्याची वेळ देशावर आली आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ९००, सरासरी २७०० रुपये तर जास्तीत जास्त ३३१५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.
पहा व्हिडिओ :