शशिकांत शिंदे : ‘मला भाजप विरोधात बोलण्यासाठी राज्यात फिरण्याची मोकळीक द्या’
मला भाजपच्या विरोधात बोलण्यासाठी राज्यात फिरण्याची मोकळीक द्या, सोमय्यांचा तोतडेपणा बाहेर काढतो, अशी जाहीर मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरेगाव तालुक्यातील जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रम कटापूर येथे घेण्यात आला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडी आणि भाजपवर टीका करत ईडीला आव्हान दिले आहे.
शशिकांत शिंदे यांनी आम्ही कोरोनाचे काम केलं मात्र पैसे घेतले नाही अशी टीका महाविकास आघाडीचे आणि शिवसेना आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता केली. ते पुढे म्हणाले की, माझ्यावर भाजपचे प्रेम होते. 100 कोटी घेतलं असत तर बरं झालं असतं. ईडीला पळवणारे आमचे कार्यकर्ते आहेत. सोमय्याचा तोतडेपणा बाहेर काढतो. आपण ईडीला आणि ईडीच्या बापाला घाबरत नाही असे सांगत ईडीला आव्हान दिले.
आपला पराभव अपघात आणि भाजपच्या कटकारस्थानाने झाल्याचा आरोप केला. अपघाताने झालेले आमदार अपघाताने निघून जातात. सकाळी TV लावला की कोणाचीतरी चौकशी चालू होते. माजी मुख्यमंत्री यांना रोज स्वप्न पडत मी पुन्हा येईन असे म्हणत फडणवीस यांनाही त्यांनी टोला लगावला.
हे ही वाचलं का?

