नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक ‘या’ तारखेला, जिल्ह्याचे लक्ष लागून | पुढारी

नाशिक बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक 'या' तारखेला, जिल्ह्याचे लक्ष लागून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले असुन या दरम्यान घडलेल्या अनेक घडामोडींनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केला आहे. शनिवारी (दि.२७ ) रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता बाजार समितीचा सभापती व उपसभापती कोण होईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया २८ एप्रिल रोजी पार पडून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाची निवडणूक तात्काळ घ्यावी अशी मागणी पिंगळे गटाच्या संचालकांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देऊन तास उलटत नाही तोच पुन्हा बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले. त्यानंतर पुन्हा काही तास उलटत नाही तोच सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया तात्काळ राबवावी. असे आदेश उच्च न्यायालयाने दिले त्यामुळे अनेक घडामोडींनंतर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीला विलंब झाला होता. परंतु आता निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया २७ मे रोजी घेण्याचे आदेश दिल्याने सभापती व उपसभापती निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला तरी अनेक नाट्यमय घडामोडी मात्र येणाऱ्या काळातही दिसुन येतील यात मात्र शंका नाही. माञ तुर्त सत्ताधारी गटाने निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.ॉ

निवडणूक कार्यक्रम

सभापती व उपसभापती निवडीची सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २७ मे रोजी सकाळी ११ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय, मार्केटयार्ड, पंचवटी येथील सभागृहात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अन् त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

नाट्यमय घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष

कोरोना काळात गोरगरिबांना वाटण्यात आलेल्या कथित धान्यवाटप घोटाळा तसेच गाळे विक्री यात १ कोटी १६ लाखांचा अपहार प्रकरणी मुख्यमंत्री तथा पणन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसऱ्यांदा झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही गटाने आपली लेखी बाजू मांडली असून त्याचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पिंगळे गटाविरोधात निकाल दिल्यास पुन्हा हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button