विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर | पुढारी

विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शुक्रवारी रात्री पवार यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर पवार पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

यानंतर दुपारी अडीच वाजता धैर्यप्रसाद हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. तेथून ते बारामतीकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button