नाशिक : उंटांना घेऊन जाण्यासाठी रायका दाखल | पुढारी

नाशिक : उंटांना घेऊन जाण्यासाठी रायका दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पांजरापोळमध्ये आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून, 99 उंट या ठिकाणी उरले आहेत. या उंटांना घेऊन जाण्यासाठी राजस्थानाहून निघालेल्या रायकांचे गुरुवारी (दि.18) शहरात आगमन झाले. आता जिल्हा प्रशासनाचे पत्र मिळाल्यानंतर उंटांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती पांजरापोळ संस्थेकडून देण्यात आली आहे. यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी उंट राजस्थानला रवाना होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तस्करीसाठी जाणाऱ्या उंटांची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. त्यानंतर 111 उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पांजरापोळ संस्थेला दिली होती. शेकडो किलोमीटर अंतर पायपीट करून आलेल्या उंटांना अन्न-पाणी न मिळाल्याने तसेच महाराष्ट्राचे वातावरण सहन न झाल्यामुळे 12 उंटांचा मृत्यू पांजरापोळ येथे झाला होता. त्यांच्या मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणिमित्रांसह पांजरापोळ संस्थेने हे उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरापोळ येथे दाखल झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button