LSG : मुंबईचा सूर्यांश लखनौ संघात | पुढारी

LSG : मुंबईचा सूर्यांश लखनौ संघात

लखनौ : लखनौ सुपर जायंटस्चा सर्वोत्तम गोलंदाज जयदेव उनाडकट दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघाने युवा खेळाडू सूर्यांश शेडगेला संधी दिली आहे. सूर्यांशने अंडर-19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलने ट्विट करून सूर्यांश लखनौ सुपर जायंटस्मध्ये सामील झाल्याची माहिती शेअर केली आहे. दुखापतग्रस्त जयदेव उनाडकटच्या जागी सूर्यांश शेडगेचा लखनौ संघात समावेश करण्यात आल्याचे स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. उनाडकट खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. सरावादरम्यान तो खांद्यावर पडला होता. यामुळे तो जखमी झाला होता. त्याच्या जागी सूर्यांशला 20 लाख रुपये देऊन संघात स्थान देण्यात आले आहे. (LSG)

सूर्यांश शेडगे हा उजव्या हाताचा युवा फलंदाज असून तो मुंबईकडून खेळतो. त्याला लखनौ सुपर जायंटस् संघाने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. सूर्यांश जाईल्स शिल्ड स्पर्धेत सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा म्हणून ओळखला जातो. गुंदेचा एज्युकेशन अकादमी (कांदिवली) साठी त्याने सात वर्षांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे एसपीएसएस मुंबादेवी निकेतन (बोरिवली) विरुद्ध या स्पर्धेत 137 चेंडूंत 326 धावा केल्या होत्या. (LSG)

हेही वाचा;

Back to top button