नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन | पुढारी

नाशिक : संजय राऊत यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तांतरावर दिलेल्या निकालानंतर नाशिकच्या दौऱ्यावर असताना पोलिसांना उद्देशून भाष्य केल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबई नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी खा. राऊत यांनी न्यायालयामार्फत अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मिळवला आहे.

खा. राऊत हे शुक्रवारी (दि. १२) नाशिक दौऱ्यावर असताना सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालावरून पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी, ‘हे सरकार बेकायदा असून, त्यांचे बेकायदा आदेश पाळाल, तर अडचणीत याल,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे पोलिसांनी खा. राऊत यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यात पोलिसांविषयी अप्रीतीची भावना निर्माण होऊन सार्वजनिक शांतता बिघडण्यास प्रवृत्त होईल, असे विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणात मंगळवारी (दि. १६) राऊत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यास मंजुरी दिली असून, मुंबई नाका पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button