नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा  | पुढारी

नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा 

नाशिक : भद्रकाली परिसरातून दुचाकी चोरास न्यायालयाने सहा महिने कारवास व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अमोल ऊर्फ बंटी वसंत साळुंके (रा. पाथर्डी गाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

श्रीराम राठोड यांच्याकडील दुचाकी नोव्हेंबर २०२१ मध्ये भद्रकाली मार्केट परिसरातून लंपास झाली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून अमोल आणि लियाकत उर्फ लकी तकदीर शहा यांना पकडले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विद्या देवरे-निकम यांनी युक्तिवाद केला. गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफळे यांनी अमोलला शिक्षा सुनावली. तर लियाकत शेख मिळून न आल्याने त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई प्रशांत जेऊघाले व सुनीता गोतरणे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button