नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत | पुढारी

नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील 19 गावांत 1 कोटी 17 लाखांतून नवीन रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या रोहित्रातून मिळणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकर्‍यांनी अतिरिक्त रोहित्र बसविण्याची मागणी आमदार कोकाटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत मंजुरीसाठी आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. दाखल प्रस्तावांना नुकतीच जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली. त्यानुसार 100 केव्ही क्षमतेच्या रोहित्रांसाठी उजनी येथील पवार वस्तीसाठी 13 लाख 14 हजार रुपये, खंबाळे येथे 12 लाख 37 हजार, चानखन बाबा नगर वडांगळी येथे 9 लाख 52 हजार, डावरे मळा मिठसागरे येथे 8 लाख, ढमाले सर वस्ती दुसंगवाडी 7 लाख 90 हजार, पांगरी बुद्रुक 9 लाख 16 हजार, पंचाळे 10 लाख 74 हजार, भरडी मळा 10 लाख 60 हजार, शहा येथे 8 लाख 37 हजार, साकुर येथे 6 लाख 89 हजार व 7 लाख 38 हजाराचे दोन स्वतंत्र रोहित्र, सातवस्ती देवपूर येथे 7 लाख 10 हजार, चिंचोली रोड सायाळे येथे 5 लाख 88 हजार, लोणारवाडी येथे जामखेड मळा येथे रोहित्रासह कनेक्शनसाठी 10 लाख 14 हजार, हनुमान मंदिर चास येथे 8 लाख 29 हजार, वडगाव पिंगळा येथे शैलाबाई गायधनी व इतर 7 जणांना कनेक्शन देण्यासाठी 3 लाख 16 हजार, सरदवाडी येथे 63 केव्हीए रोहित्रासाठी 6 लाख 89 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. कार्यारंभ आदेश होऊन या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

ब्राह्मणवाडेला कबड्डी मॅट
ग्रामीण भागात कबड्डी हा अतिशय लोकप्रिय खेळ प्रकार आहे. ब्राह्मणवाडे येथे कबड्डीची मॅट बसविण्याची मागणी कबड्डीपटू व तरुणांकडून करण्यात येत होती. आमदार कोकाटे यांनी जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेतून कबड्डी मॅटसाठी 8.50 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. त्यामुळे कबड्डी खेळणार्‍या युवकांचे मॅटवर कबड्डी खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तरुणांनी आमदार कोकाटे यांचे आभार व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

Back to top button