वैद्यकीय कचरा विल्हेवाट ठेका वीस वर्षांपासून एकालाच , राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांचे आयुक्तांना निवेदन | पुढारी

वैद्यकीय कचरा विल्हेवाट ठेका वीस वर्षांपासून एकालाच , राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांचे आयुक्तांना निवेदन

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत मागील वीस वर्षांपासून एकाच ठेकेदाराला जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट लावणार्‍या ठेकदाराच्या ठेक्याची मुदत संपली आहे. त्याची त्वरित नवीन निविदा प्रसिद्ध करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

वीस वर्षांपासून एकाच ठेकेदाराला मुदतवाढ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, ह्यूमन राईटचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शाहरुख शेख, सागर गायकवाड, ओमकार गंजी, महेश माळी आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले, महापालिका हद्दीत नागरिकांना वैद्यकीय सेवा देणार्‍या विविध वैद्यकीय संस्था व हॉस्पिटल आहेत. यामधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने 2003 मध्ये प्रकल्प उभा केला आहे. तो चालवण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

या प्रकल्पाला वीस वर्षे पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प एकाच ठेकेदाराकडे देण्यात आला आहे. वास्तविक पाहता प्रकल्पाची मुदत दोन ते तीन वेळा संपूर्ण संपलेली असल्यामुळे नव्याने निविदा काढून नव्या संस्थेची नियमानुसार नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेतील संबंधित काही अधिकार्‍यांच्या हितसंबंधांमुळे तोच ठेकेदाराला कायमस्वरूपी मुदत वाढ देण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

Back to top button