नाशिक : उन्हाळ कांदा भिजल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी | पुढारी

नाशिक : उन्हाळ कांदा भिजल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे कांद्याला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसात काढून ठेवलेला कांदा ओला होऊन सडू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय टोपे यांनी अडीच एकरांत उन्हाळ कांद्याचे पीक घेतले. त्यासाठी 70 हजार रुपये पीककर्ज, पत्नीचे मंगळसूत्र तसेच इतर सोन्याचे दागिने बँकेत गहान ठेवून सोनेतारण कर्ज घेत उन्हाळ कांद्याचे जोमदार पीक घेतले. बाजारभाव वाढतील तेव्हा कांदा विक्री करू या हेतूने चाळीमध्ये कांदा साठवण्यासाठी सुरुवात करण्याअगोदरच तीन-चार दिवस सलग गारपिटीमुळे काढून ठेवलेला आणि शेतातील कांदा ओला होऊन सडू लागला. दहा ते पंधरा टक्केही कांदा हातात येणार नसल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरीही निघणार नसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने या अस्मानी संकटाने संपूर्ण स्वप्नांवर पाणी फिरवल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संजय टोपे सांगत आहे.

हेही वाचा : 

Back to top button