

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील विरोधक एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नक्कीच सत्तापरिवर्तन होणार आहे आणि या सत्तापरिवर्तनाला सुरुवात झाली आहे. असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१४ एप्रिल) माध्यमांशी बोलताना केलं. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधक राज्यात ४० जागा जिंकतील. वाचा सविस्तर बातमी. (Sanjay Raut)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची काल (दि.१३) भेट घेतली. तेव्हापासून राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. ही राजकीय भेट ताजी असतानाच राहुल गांधी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. अद्याप या भेटीची तारीख समोर आलेली नाही. या संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, राहुल गांधी मातोश्रीवर कधी येणार हे वेणुगोपाल-ठाकरे बैठकीत ठरणार आहे.
देशातील विरोधक एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नक्कीच सत्तापरिवर्तन होईन आणि या सत्तापरिवर्तनाला सुरुवात झाली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, आम्ही सोनिया गांधी यांनाही मुंबईत बोलावलं आहे. राहुल गांधी अनेक विरोधी नेत्यांना भेटत आहेत.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
२०२४ मध्ये देशात १०० टक्के सत्तापरिवर्तन होणार. आणि या सत्तापरिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोेधक राज्यात ४० जागा जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बोलणं टाळत ते म्हणाले, युपीच्या स्थितीवर मी का बोलावं.
हेही वाचा