जपानमध्ये बहरली अठरा लाख ट्युलिप फुले! | पुढारी

जपानमध्ये बहरली अठरा लाख ट्युलिप फुले!

टोकियो : ट्युलिप फुलं म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर नेदरलँडस्मधील ट्युलिपच्या बागाच येत असतात. अर्थात, केवळ याच देशात ट्युलिप फुलांच्या बागा आहेत, असे नाही. अगदी आपल्या भारतातही जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ट्युलिप फुलांची सुंदर बाग आहे. जपानमध्येही एक गाव खास अशा फुलांसाठीच प्रसिद्ध आहे. आता या गावात तब्बल अठरा लाख ट्युलिप फुले बहरली आहेत!

सोबतचे छायाचित्र जपानच्या नबानो नो सातोच्या ट्युलिप्स गार्डनचे आहे. त्यास जपानच्या ‘फुलांचे गाव’ संबोधले जाते.  ट्युलिप फुलांचा हा बगीचा रात्री प्रकाशाने उजळतो. येथे लाल, पांढरे, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे ट्युलिप पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात. अतिशय सुंदर फुले असलेली ही बाग जगभरातील पर्यटकांना आकर्षित करीत असते. आताही या बागेत फुलांना बहर आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या बागेला भेट देत आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button