Flight : मद्यधुंद अवस्थेत प्रवाशाकडून फ्लाइटमध्ये पुन्हा गोंधळ; प्रवाशांचा जीव धोक्यात येईल असे कृत्य | पुढारी

Flight : मद्यधुंद अवस्थेत प्रवाशाकडून फ्लाइटमध्ये पुन्हा गोंधळ; प्रवाशांचा जीव धोक्यात येईल असे कृत्य

पुढारी ऑनलाइन डेस्क : गेल्या काही महिन्यात विमानांमध्ये प्रवाशांकडून गोंधळ घालण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शुक्रवारी दिल्ली-बंगळूरच्या फ्लाइटमध्ये Flight एका मद्यधूंद प्रवाशाने पुन्हा एकदा गोंधळ घातले. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला बेंगळूर आंतराराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर प्रतीक (वय 30), असे या प्रवाशाचे नाव आहे.

Flight : नेमका काय प्रकार घडला

आर प्रतिक हा शुक्रवारी दिल्लीहून बेंगळुरूला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बसला. यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले होते. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत त्याने विमान प्रवासा दरम्यान फ्लाइटचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृतीमुळे प्रत्यक्ष सुरक्षेला धोका पोहोचला नसला तरी अन्य प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे एका प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्ष दलाने ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्यात आले.

Flight : प्रवाशावर गुन्हा दाखल

विमानात प्रवास करताना प्रतीक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला “आम्ही त्याच्यावर IPC कलम 290 (सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे) आणि 336 (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे) आणि 336, विमान कायद्याचे कलम 11A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एका सहप्रवाशाने तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या तो स्टेशन सोडला असताना पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. चौकशी सुरू असून त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

Old Age Health : वृद्धापकाळ आणि पचनसंस्था

ब्युटी विथ ब्रेन… संशोधिका आणि मॉडेलही!

Back to top button