नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश | पुढारी

नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चुंचाळे शिवारातील ३२७ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी विकासाकरिता संपादन कामाच्या तपासणीकरिता शासनाने तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्यासमवेत मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे सदस्य तर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी हे सदस्य सचिव असतील.

जिल्ह्यात नवीन एमआयडीसीच्या उभारणीसाठी जागेचा शोेध सुरू आहे. अंबड-सातपूर एमआयडीसीलगत चुंचाळे शिवारातील ३२७ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी उभारावी, अशी मागणी उद्योग क्षेत्रातून होत आहे. तर संबंधित जागेवर अडीच लाखांहून अधिक वृक्ष असून, हे क्षेत्र नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असल्याने शहरवासीयांसह पर्यावरणप्रेमींनी या ठिकाणी एमआयडीसीला विरोध दर्शविला आहे. त्यामूळे या वादावर तोडगा काढण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे.

या समितीने या ठिकाणी एमआयडीसीसाठी जागा संपादित करण्याबाबत तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ही समिती आता काय निर्णय घेते यावरच चुंचाळे शिवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा आता समितीच्या कामकाजाकडे लागलेल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button