७ हजार ४०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : फडणवीस | पुढारी

७ हजार ४०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यभरात अवकाळी पावसानंतर शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. फडणवीस म्हणाले-शेतकऱ्यांना तत्का‍ळ मदत दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील. अवकाळीग्रस्तांच्या मागे खंबीरपणे सरकार उभे राहणार. अकोला मंदिर दुर्घटनेतील जखमींचा खर्च सरकार करणार.

गेल्या ४८ तासांत मराठवाड्यासह विदर्भातील काही भागांत पाऊस आणि गारपीटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलीय. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे.

बीड जिल्ह्यातील नित्रूड गावात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. नित्रुडसह परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटही झाली. गारपीट व अवकाळी पावसामुळे आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, गहू, हरभरा ही पिकांना फटका बसला आहे. उभी पिके ही भिजल्याने ज्वारी व गहू पिकाचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

पावसासह गारांच्या माऱ्यामुळे रब्बी पिकांसह आंबा आणि इतर फळबागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा ही पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. तर उभी पिके भिजल्याने ज्वारी व गहू पिकांचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, उमराणे परिसरातील चिंचवे येथे काल (दि. ९) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे.

Back to top button