

नाशिक : आडगाव येथील श्रीरामनगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. राहुल सुनील गांगुर्डे (३०) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने मंगळवारी (दि.२८) घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काठे गल्लीत एकास मारहाण
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी मिळून आशुतोष भोसले (२४, रा. सातपूर) यास मारहाण केल्याची घटना काठे गल्ली परिसरात घडली. आशुतोष याच्या फिर्यादीनुसार, संशयित यश गोंधळी, क्रिश शिंदे, सचिन वाघमारे व श्रीकांत उर्फ लड्डू रणखांबे यांनी मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पाचच्या सुमारास कुरापत काढून मारहाण करीत धारदार हत्याराने वार करीत जखमी केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास
नाशिक : बिटको रुग्णालयाजवळ दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने ४९ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) दुपारी घडली. मेहबूब मोहमंद शेख (रा. फातिमानगर, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास केली.याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :