खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर या मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट चर्चेत | पुढारी

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर या मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट चर्चेत

पुढारी डिजीटल : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतंच पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ते सक्रिय राजकारणापासूनही दूर होते. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते बाहेर पडलेले बघायला मिळाले होते. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बापट यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने देखील भावनिक पोस्ट करत बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिता आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ” यासोबतच रुचिताने बापट यांच्यासोबतचा फोटोही पोस्ट केला आहे.

 

Back to top button