Amritpal Singh : अमृतपाल सिंग आज आत्मसमर्पण करणार? पोलिसांची घेराबंदी, पंजाबमध्ये मोठ्या हालचाली... | पुढारी

Amritpal Singh : अमृतपाल सिंग आज आत्मसमर्पण करणार? पोलिसांची घेराबंदी, पंजाबमध्ये मोठ्या हालचाली...

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंजाबमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंह (Amritpal Singh) आज आत्मसमर्पण करू शकतो. पंजाब पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. गेल्या 11 दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत आहे. मध्यंतरी तो नेपाळला पळून गेल्याची माहिती समोर येत होती. मात्र आज, पंजाब पोलिसांच्या हालचाली अचानक वाढल्या आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमृतपाल आज आत्पसमर्पण करू शकतो. तत्पूर्वी त्याने पोलिसांसमोर काही अटी ठेवल्या आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारिस पंजाब दे चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी घेरले आहे. तो आज आत्मसमर्पण करू शकतो. त्याने आत्मसमर्पण करण्यापूर्वी पंजाब पोलिसांसमोर काही अटी ठेवल्या आहे. अमृतपाल थोडा वेळात अकाल तख्त ला भेटण्यासाठी जाऊ शकतो त्यानंतर तो आत्मसमपर्ण करू शकतो. त्यामुळेच त्याने पोलिसांसमोर तीन अटी ठेवल्या आहे. मात्र, याचे अधिकृत वृत्त किंवा याची पुष्टी अद्याप पंजाब पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.

Amritpal Singh : आयपीएस आणि पीपीएस अधिका-यांच्या बदल्या

दरम्यान, अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब सरकारने आयपीएस आणि पीपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. वत्सला गुप्ता आयपीएस यांना जालंदरहून डीसीपी मुख्यालय अमृतसर येथे पाठवण्यात आले. पीपीएस स्वर्णदीप सिंग यांची एसएसपी जालंधर देहत येथून डीसीपी इन्व्हेस्टिगेशन अमृतसर या पदावर बदली करण्यात आली आहे. पीपीएस मुखविंदर सिंग यांची डीसीपी इन्व्हेस्टिगेशन, अमृतसर येथून एसएसपी जालंधर देहाट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Amritpal Singh : अमृतपालला चोहीकडून घेरण्याची पंजाब पोलिसांची रणनिती

अमृतपाल सिंग याला चोहीकडून घेरण्याची रणनिती पोलिसांनी आखली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत. एसएसपी गुलनीत खुराणा यांनी तलवंडीत पदभार स्वीकारला आहे. नाकाबंदी करून तपासणी मोहीम सुरू केली आहे.
सरोया पीपीएस जगजीत सिंग यांची एडीसीपी मुख्यालय जालंधर येथून एसपी ऑपरेशन्स गुरुदासपूर येथे बदली करण्यात आली आहे. पीपीएस सरबजीत सिंग यांची एसपी इन्व्हेस्टिगेशन जालंधर देहाट येथून एसपी इन्व्हेस्टिगेशन होशियारपूर येथे बदली करण्यात आली आहे. पीपीएस मनप्रीत सिंग यांची एसपी इन्व्हेस्टिगेशन, जालंधर देहत येथे एसपी इन्व्हेस्टिगेशन, होशियारपूर येथून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

अमृतपाल सिंगला कोणत्‍याही क्षणी होईल अटक : पंजाब सरकारची उच्‍च न्‍यायालयात माहिती

Amritpal Singh Update: अमृतपाल सिंगला आश्रय दिल्याप्रकरणी पटिलायामधून महिलेला अटक

Back to top button