नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू | पुढारी

नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल आता पुन्हा सुरू झाल्याने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील तब्बल साडेनऊ हजार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजारांचे अनुदान मिळाले.

दोन वर्षे शहरात कोरोना महामारीने हजारोंहून नागरिकांचा मृत्यू झाल्याचे भयाण वास्तव होते. अनेक घरांतील कर्तेपुरुष दगावल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली होती. कोरोनाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून पन्नास हजारांचे अनुदान दिले जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविडने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले होते. नाशिक जिल्ह्यातील व शहरातील कोविड आजाराने मृत व्यक्तींच्या वारसांना रुपये पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित केले जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात चार हजार रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे आहे.

हेही वाचा:

Back to top button