नाशिक : कर्णबधिरपणा ओळखण्यासाठी बेरा यंत्र लवकरच

बेरा यंत्र, संग्रहीत 
छायाचित्र www.pudhari.news
बेरा यंत्र, संग्रहीत छायाचित्र www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा
कर्णबधिरपणाचे कारण देत दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवून लाभ घेणार्‍यांना चाप बसणार आहे. कारण जिल्हा रुग्णालयात लवकरच बेरा (ब्रेनस्टेम इव्होक रिस्पॉन्स ऑडिमेट्री) यंत्र बसविण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग निधीमधून हे यंत्र खरेदी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत निविदा प्रक्रियेत असलेले हे यंत्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याची खरेदी होऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात ते बसविण्यात येणार आहे. कर्णबधिर व्यक्ती आहे की नाही या संदर्भातली तपासणी करण्यासाठी श्रवण तपासणी केली जाते. त्यालाच ऑडिओमेट्री असे म्हणतात. हे करण्यासाठी एक आवाजबंद खोलीत श्रवण यंत्राद्वारे संबंधित व्यक्तीच्या कानाला ऑडिओमीटरचे हेडफोन लावून वेगवेगळ्या प्रकारची तीव्रता आणि वारंवारितानुसार आवाज ऐकवले जातात. आणि मग त्या व्यक्तीचा प्रतिसाद नोंदविला जातो. हा प्रतिसाद श्रवण आलेखावर नोंदवला जातो. आणि मग श्रवण आलेख काढला जातो. या, श्रवण आलेखावरून संबंधित कर्णबधिर व्यक्तीच्या कानाची ऐकण्याची क्षमता किती आहे. मग त्यानुसार जर 40 टक्के कर्णबधिरत्वाचे प्रमाण असेल, तर त्या व्यक्तीला श्रवण आलेखावरून अपंग प्रमाणपत्र देण्याची शिफारस करण्यात येते. त्याचबरोबर याच श्रवण आलेखावरून ऐकण्यासाठी श्रवण यंत्रदेखील शिफारस केली जाते. लहान मुलांच्या बाबतीत दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता तपासण्यासाठीदेखील ही बेरा टेस्ट केली जाते. बेरा टेस्ट केल्यानंतर उजवा आणि डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता किती आहे हे श्रवण आलेखाद्वारे समजते. श्रवण आलेखावरून कर्णबधिर व्यक्तींचे अपंगत्व किती आहे हे ठरवले जाते. त्याचबरोबर श्रवण यंत्र देण्याची शिफारस केली जाते. श्रवण यंत्रामध्येदेखील वेगवेगळे प्रकार पडतात. तर योग्य श्रवण यंत्र कोणते द्यावे याबाबतदेखील माहिती बेरा टेस्ट केल्यानंतर समजते. लवकरच जिल्ह्यात असे यंत्र येणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news