नाशिक : मूत्रपिंड दान करून भाच्याला जीवनदान | पुढारी

नाशिक : मूत्रपिंड दान करून भाच्याला जीवनदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डायलिसिसवर असलेल्या भाच्याला मूत्रपिंड दान करून आत्याने जीवनदान दिले. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

यातील विशेष बाब म्हणजे 22 वर्षीय रुग्णावर आत्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले आहे. भाच्याला मूत्रपिंड दान देणार्‍या त्याच्या आत्याची तब्येत तंदुरुस्त असल्याचे मूत्रपिंड विकार आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. प्रकाश उगले यांनी सांगितले. सह्याद्री हॉस्पिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले की, मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे अनुभवी शल्यचिकित्सक, सह्याद्री हॉस्पिटल नाशिकमध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची घेण्यात येणारी काळजी यामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. ही शस्त्रक्रिया मूत्रपिंड विकार व प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. प्रकाश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली यूरोसर्जन डॉ. नंदन विळेकर, वैद्यकीय टीम व मॅनेजमेंट टीमच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.

हेही वाचा:

Back to top button