Deepika Padukone : अन्‌ दीपिकाने रणवीरला केलं इग्नोर (Video) | पुढारी

Deepika Padukone : अन्‌ दीपिकाने रणवीरला केलं इग्नोर (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड कलाकार कॅमेऱ्यासमोर काय करतात आणि काय नाही यावर लोक बारीक लक्ष ठेवून असतात. अनेकवेळा अभिनेते काहीही बोलत नसले तरी त्यांच्याबद्दल खूप चर्चा होते. असेच काहीसे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग यांच्याबाबत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नुकतेच दोघेही इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३ मध्ये पोहोचले होते, तेव्हा दीपिकाने कॅमेऱ्यासमोर जे केले ते पाहून लोक म्हणत आहेत की, ती रणवीर सिंगकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा लोक त्यांच्या बॉन्डिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर याआधीही त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. (Deepika Padukone)

खरं तर असं झालं की दीपिका पदुकोण आणि रणवीर काल रात्री इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स या खेळाशी संबंधित कार्यक्रमात पोहोचले. यावेळी दीपिकासोबत तिचे वडील प्रकाश पदुकोणही दिसले. त्याच इव्हेंटमध्ये जेव्हा दीपिका तिच्या कारमधून रेड कार्पेटवर आली तेव्हा रणवीरने तिच्यासोबत चालण्यासाठी हात पुढे केला. मात्र, दीपिका तिच्या वडिलांसोबत फिरताना दिसली आणि हे पाहून लोक म्हणू लागले की अभिनेत्री रणवीरकडे दुर्लक्ष करत आहे.

या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स आहेत ज्यात लोक त्यांच्या बाँडिंग आणि भांडणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. लोक म्हणाले – तिची देहबोली पूर्णपणे बदलली आहे. असे वाटते की या कार्यक्रमापूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. दुसर्‍या व्यक्तीने म्हटले आहे – काहीतरी गडबड आहे, रणवीरला दीपिकाच्या पोस्ट देखील आवडत नाहीत. आता ती त्याचा हातदेखील धरत नाही, असे दिसते आहे की रोमान्स लवकरच संपणार आहे. एका यूजरने म्हटले – दीपिका रागावली आहे, तिने तिचा हात धरला नाही. काही लोक मस्ती करतानाही दिसत आहेत आणि म्हणाले – दीपिकाने हात पुढे केला नाही. दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षीही विभक्त झाल्याच्या अफवा आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील भांडणाच्या अफवा समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, दोघांनीही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या अफवांचे खंडन केले.

video-manav.manglani वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Back to top button