नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
इंदिरानगर महिला बँकेजवळ रस्त्याच्या कडेला जमा केलेला कचरा जाळत असल्याने आढळून आले. कचरा जाळणाऱ्यांकडून प्रशासनाने दंड वसूल करावा अशी मागणी केली जात आहे. शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने स्वच्छता उशिरा होते. काही ठिकाणी कचरा जाळला जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. कचरा जाळला तेथे लावलेली झाडे व संरक्षक जाळीही जळाली आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. रस्त्याच्या बाजूला जमा झालेला पालापाचोळाही जमा करावा.
– नीलेश साळुंखे, शिवसेना विभागप्रमुख
-नागरिकांनी नियमित कचरा टाकावा. रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारावा.
– सयाजी पगारे. समाजिक कार्यकर्ता
हेही वाचा :