नाशिक : महाजन, छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमानप्रवास केल्याने राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. परंतु याबाबत ना. महाजन यांनी हा प्रवास केवळ योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्येही गारपिटीने शेकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी ना. गिरीश महाजन यांना शनिवारी (दि. 18) तातडीने लातूर आणि नांदेड दौर्यावर जायचे होते. दरम्यान, शनिवारी माजी मंत्री छगन भुजबळ विमानाने अन्य एका कार्यक्रमासाठी लातूरला येणार असल्याचे कळल्यानंतर ना. महाजनही त्याच विमानाने आले. विशेष म्हणजे भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणल्याने एकमेका साह्य करू, अशी चर्चा रंगली आहे.