पिंपरी : रिक्षाचालकाच्या डोक्यात विटा मारून खून | पुढारी

पिंपरी : रिक्षाचालकाच्या डोक्यात विटा मारून खून

पिंपरी : रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्षात काहीजण बसलेले असताना रिक्षाचालकाने त्यांना हटकले. यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाच्या डोक्यात विटा आणि सिमेंट गट्टू मारून खून करण्यात आला. ही घटना दापोडीतील गणेशनगर येथे रविवारी घडली. अलीम इस्माईल शेख (वय 45, रा. कृष्णानगर, पिंपळे गुरव) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी शेख यांची रिक्षा गणेशनगर येथे रस्त्यालगत उभी होती. या वेळी त्यांच्या रिक्षात अमित कांबळे (वय 28, रा. महात्मा फुलेनगर दापोडी) व त्यांचे सहकारी बसले असल्यामुळे शेख यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने रिक्षात बसलेल्यांनी शेख यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button