UBS-Credit Suisse deal | बँकिंग क्षेत्र संकटात, ‘ही’ मोठी बँक देणार ९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

UBS-Credit Suisse deal | बँकिंग क्षेत्र संकटात, ‘ही’ मोठी बँक देणार ९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बँकिंग क्षेत्रातील संकट टाळण्यासाठी UBS बँक स्वित्झर्लंडमधील सर्वात दुसरी मोठी बँक क्रेडिट सुईस टेकओव्हर करणार आहे, असे स्विस प्राधिकरणाने जाहीर केले आहे. केड्रिट सुईस बँक गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडली आहे. बँक अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे क्रेडिट सुईसचे मोठे नुकसान झाले आहे. आता ही बँक UBS Group AG ताब्यात घेत असून त्यासाठी स्विस सरकारने मध्यस्थी केली आहे. (UBS-Credit Suisse deal)

स्विस सेंट्रल बँकेने असे म्हटले आहे की विलीन झालेल्या बँकेसाठी १०० अब्ज स्विस फ्रँक्स (१०८ अब्ज डॉलर) सहाय्य हे UBS आणि क्रेडिट सुईससाठी भरीव तरलता प्रदान करेल. नेमका या कराराचे मूल्य अद्याप उघड केले गेले नसले तरी, फायनान्शियल टाईम्सच्या रिपोर्टमध्ये असे सूचित केले आहे की ते २ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

दरम्यान, Credit Suisse Group AG च्या ताब्यात देण्यापूर्वीच ही बँक आर्थिक संकट टाळण्यासाठी ९ हजार नोकर्‍या कमी करण्याचा विचार करत आहे. दोन्ही बँकांमध्ये मिळून १ लाख २५ हजार कर्मचारी काम करतात. UBS Group AG ही एक बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक असून ती स्वित्झर्लंडमधील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखली जाते.

यूबीएसचे अध्यक्ष कोल्म केल्हेर यांनी म्हटले आहे की नोकरी कपातीचा आकडा लवकरच कळेल. पण तो लक्षणीय असेल. क्रेडिट सुईसचे मुख्य कार्यकारी अधिकारी उलरिच कोर्नर यांनी सांगितले आहे की त्यांनी आधीच सुमारे ८ टक्के कर्मचारी कपात केली आहे.
"UBS ने क्रेडिट सुईस ताब्यात घेतल्याने सध्याच्या कठीण परिस्थितीत आर्थिक स्थिरता आणि स्विस अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी एक उपाय सापडला आहे," असे स्विस सेंट्रल बँकेने म्हटले आहे. स्विस फायनान्शियल मार्केट सुपरवायझरी ऑथॉरिटी (FINMA) ने आश्वासन दिले आहे की दोन्ही बँका सर्व व्यावसायिक उपक्रम कोणत्याही निर्बंध अथवा व्यत्ययाशिवाय सुरू ठेवू शकतात.

१६६ वर्षे जुन्या असलेल्या क्रेडिट सुईसची (Credit Suisse) गणना जगातील सर्वांत मोठ्या बँकेमध्ये केली जाते. ही UBS AG नंतरची स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वांत मोठी बँक आहे. (UBS-Credit Suisse deal)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news