नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पेंशनधारकांचा भव्य मोर्चा

नाशिक : नाशिक येथील गोल्फ मैदानावर तीव्र घोषणाबाजी करत असताना विविध संघटना व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.  (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : नाशिक येथील गोल्फ मैदानावर तीव्र घोषणाबाजी करत असताना विविध संघटना व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी.  (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर गुरुवार, दि.16 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये विविध कर्मचारी संघटनानेही देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून तीव्र घोषणाबाजी केली आहे.

का काढला जातोय माेर्चा?

राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून शासनाने नवी पेन्शन योजना लागू केली. 2003 मध्ये तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने हा जगण्याचा आधारच काढून घेऊन अन्याय केला आहे. ही योजना केवळ दरमहा तीन ते पाच हजार पेन्शन देणारी आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जगण्याची शाश्वतीच शासनाने काढून घेतली. गेली 17 वर्षे कर्मचारी या योजनेसाठी संघर्ष करीत असून पुन्हा एकदा मोर्चाला तीव्र वळण आलेले पहावयास मिळत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news