वाघोदा खुर्द घटना : ट्रकचालकाचे अपहरण नव्हे तर खून!

वाघोदा खुर्द घटना : ट्रकचालकाचे अपहरण नव्हे तर खून!
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील तरूण ट्रकचालक बेपत्ता झालेले नसून दारू पिण्यावरून तिघांनी बेदम मारहाणीत ठार करून औरंगाबाद-वैजापूर घाटात मृतदेह फेकून दिल्याचा धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

याप्रकरणात एकाला सावदा पोलीसांनी अटक केली आहे. इतर दोघेजण फरारी आहेत. सावदा पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल (वय ३५) हा त्याच्याकडील मालवाहू ट्रक (एमएच १९ सीवाय ६८४३) घेऊन कामावर जात होता.

दारू पिण्यावरून झाली वादावादी

याच दरम्यान १५ मे २०२१ सकाळी १० वाजता ऋषिकेश ऊर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ (वय-२४, रा. दावरवाडी, ता.पैठण, जि. औरंगाबाद), राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पवन नगर नाशिक) आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही, रा. औरंगाबाद) यांनी संगनमताने याकूब पटेल यांचे अपहरण नाशिक एमआयडीसी परिसरात केले. तेथील एका हॉटेलमध्ये चौघांमध्ये दारू पिण्यावरून वादावादी झाली आणि तिघांनी याकुब यांना बेदम मारहाण केली होती. त्याच त्याचा मृत्यू झाला होता.

याकूब पटेल हा घरी आला नसल्याने सावदा पोलीस ठाण्यात सुरूवातील मिसींग दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यामातून याकूब यांच्या संपर्कातील ऋषीकेश शेजवळ याला ताब्यात घेतले.

ऋषीकेशकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता राजू ठेगडे आणि संजय याच्यासह इतर दोन साथीदारांची नावे सांगितले. यानंतर सावदा पोलीसांनी ऋषीकेशला खाक्या दाखवताचा पोपटासारखा बोलून आम्ही तिघांना दारू पिण्याच्या वादातून याकूबला बेदम मारहाण करून ठार केल्याची माहिती दिली.

मृतदेह औरंगाबदा- वैजापूर घाटात फेकला

त्यानंतर तिघांनी संगनमताने मृतदेह औरंगाबदा- वैजापूर घाटात फेकून दिल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार सावदा पोलीसांनी वैजापूर पोलीसांशी संपर्क साधला असता एकाची आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याप्रकरणी याकूब पटेल यांचा खून केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील इतर दोघेजण आरोपी अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या ऋषीकेशला न्यायालयाने ८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

विभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, सुरेश आठवले, मोहसीन खान पठाण, विशाल खैरनार यांच्यासह सावदा पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news