पिंपळनेर: ग्रामीण भागातील महिलांची कायद्याबाबत जनजागृती | पुढारी

पिंपळनेर: ग्रामीण भागातील महिलांची कायद्याबाबत जनजागृती

पिंपळनेर(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पेरेजपूर येथे महिला मेळावा आयोजित करून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्यायमूर्ती के. टी. अढायके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती नीलेश पाटील उपस्थित होते.

ॲड. पूनम काकुस्ते (शिंदे) यांनी महिलां मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्य घटनेने पुरुषांएवढेच समांतर अधिकार महिलांना दिलेले आहेत. त्यामुळे तिला तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता शिक्षण घेण्याचा, जगण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. याप्रसंगी  ॲड. व्ही. ए. खैरनार यांनी कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंधक कायदा या कायद्यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात न्यायमूर्ती के. टी. अढायके यांनी राष्ट्रीय महिला आयोग तसेच विविध कायद्यांवर मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील महिला माता भगिनींनी कशाप्रकारे जागृत राहिले पाहिजे याविषयी विविध उदाहरणे देऊन कायद्याचे महत्त्व पटवून दिले. मेळाव्यास साक्री वकील संघाचे अध्यक्ष वाय.पी. कासार, ज्येष्ठ विधिज्ञ एस. जे. पाटील, करुणा गावित, रुपाली देसले, चंद्रकला देवरे, साक्री न्यायालयाचे अधीक्षक गायकवाड, विवेक सोनवणे, महिला बचत गटाच्या तालुका समन्वयक सुमन भदाणे आदी उपस्थित होते. पेरेजपूर ग्रामपंचायतीच्या मार्फत गावातील कर्तव्यदक्ष विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार न्यायमूर्ती अढायके यांच्यामार्फत करण्यात आला. ॲड. चारू शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच मनोज देसले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button