Naatu Naatu Song : ‘नाटू नाटू’चा अर्थ काय?; ४३ रिटेकनंतर शूट झालं गाणं | पुढारी

Naatu Naatu Song : ‘नाटू नाटू’चा अर्थ काय?; ४३ रिटेकनंतर शूट झालं गाणं

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर ( RRR) चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ ( Naatu Naatu Song ) या गाण्याला बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार मिळाला.  यानंतर काहीजण ‘नाटू नाटू’ शब्दाचा अर्थ शोधत आहेत. तर मग ‘नाटू नाटू’ शब्दाचा अर्थ, कोरिओग्राफर आणि गायक कोण आहेत तुम्हाला माहितीये का? याबद्दल अनेक मनोरंजक किस्से जाणून घेऊया.

आरआरआर ( RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’  ( Naatu Naatu Song ) हे गाणे हिंदी भाषेत डब केले गेले आहे. याचा हिंदीत अर्थ ‘नाचो नाचो’ असा होत आहे. मात्र. तेलुगू व्हर्जन ‘नाटू नाटू’ ला यंदाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर ‘नाटू नाटू’ याचा अर्थ वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळा सांगितला आहे. हिंदीत याला ‘नाचना’, कन्नडमध्ये ‘हल्ली नातु’, तमिळमध्ये ‘नट्टू कूथु’ आणि मल्याळममध्ये ‘करिन्थोल’ असा उच्चारला जात आहे.

गायक आणि कोरिओग्राफर कोण आहे?

‘नाटू नाटू’ गाण्याला संगीत एमएम कीरावानी यांनी दिले असून चंद्र बोस यांनी हे गाणे लिहिले आहे. तर गायक काल भैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर प्रेम रक्षित यांनी गाण्याचे कोरिओग्राफर (नृत्यदिग्दर्शन) केले आहे. या गाण्याचे शूटिंग युक्रेनमध्ये पार पडले आहे.

गाण्याचे ४३ रिटेकनंतर शूट केले

‘नाटू नाटू’ या गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या गाण्याचे कोरिओग्राफ करण्यासाठी दोन महिने लागले आहेत. अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसाठी ११० मुव्ह्ज डिझाईन केल्या होत्या. यातून दोघांना जुळवून घेणे खूप कठीण होते. त्यामुळे मी थोडा उदास होतो, मात्र, एसएस राजामौलीपासून राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसह सगळ्या टिमने पूर्ण पाठिंबा दिला. चित्रपटाच्या शूटिंगनंतर या गाण्याचा सराव केला. हे गाणे २० दिवसात सुमारे ४३ रिटेकनंतर शूट करण्यात आले आहे. आणि आज या सर्व मेहनतीचे फळ मिळाले आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

आरआरआर चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, आलिया भट्ट आणि श्रिया सरन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ५५० कोटींच्या बजेटमध्ये बनविलेल्या चित्रपटाने १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ऑस्करपूर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कारही गाण्याला मिळाला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button