नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल | पुढारी

नाशिक : कोथिंबीर, मेथीसह कांदापातही मातीमोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील बाजार समितीत कोथिंबिरीची आवक सलग तिसर्‍या दिवशीही वाढल्याने तिला मातीमोल भाव मिळाला. शेकडा 100 ते 200 रुपये असा नीचांकी दर मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांना वाहतूक खर्चही निघाला नसल्याचे समोर आले आहे. यातच मेथी आणि कांदापातीचेही दर घसरले आहेत. दोन्ही पालेभाज्यांना सरासरी शेकडा 500 ते 700 रुपये दर मिळत आहे. दरम्यान, बाजारात सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक वाढली असून, दर कवडीमोल आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिरीला शुक्रवारी (दि. 3) उठाव नसल्याने काही संतप्त शेतकर्‍यांनी हा माल लिलावातून परत घेत दिंडोरी रोडने ये-जा करणार्‍या नागरिकांना फुकट वाटला होता. शनिवारी (दि. 4) दुसर्‍या दिवशी बाजारभावात फारशी सुधारणा झाली नाही. कोथिंबिरीच्या जुडीला अवघा एक-दोन रुपये दर मिळाल्याने शेतकर्‍यांना रिकाम्या हाती घराकडे परतावे लागले.

हेही वाचा:

Back to top button