Ajay Devgn : रविना खूप नाटकी आणि खोटारडी | पुढारी

Ajay Devgn : रविना खूप नाटकी आणि खोटारडी

पुढारी ऑनलाईन : ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रविना टंडन नेहमीच चर्चेत असते. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रविनाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. चित्रपटाबरोबरच रविनाच्या खासगी आयुष्याबद्दलही बरीच चर्चा झाली. अक्षय कुमारबरोबर रविनाच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर रविनाचे नाव अजय देवगणशीही ( Ajay Devgn ) जोडले गेले होते.

अजय ( Ajay Devgn ) आणि रविनाची जोडी ‘दिलवाले’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. नंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चाही झाली. मध्यंतरी रविनाने एका मुलाखतीत यावर भाष्य केले होते. अजय आणि रविना दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावा तिने केला होता. तसेच अजयने तिला प्रेमपत्रेसुद्धा लिहिली असल्याचे रविनाने सांगितले होते. आता अजयने त्यावर खुलासा केला आहे. तो म्हणाला, ती खूप नाटकी आहे, याबरोबरच ती जन्मजात खोटारडी आहे. रविना ही अजयची बहीण नीलमची मैत्रीण होती आणि त्यामुळेच तिचे घरी येणे-जाणे होते. याबरोबरच तेव्हा त्यांच्यात असे काहीच नसल्याचा खुलासा अजय देवगणने केला होता.

Back to top button