मालेगाव : प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने रोखलं अन् आमदाराचा चढला पारा

मालेगाव मनपा
मालेगाव मनपा
Published on
Updated on

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

येथील महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना सुरक्षारक्षकाने रोखल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. गुरुवारी (दि.९) दुपारी हा प्रकार घडला.

मालेगाव महानगरपालिकेत वारंवार होणाऱ्या आंदोलन आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत, परंतु त्यांची पद्धतच वादग्रस्त ठरु पाहत आहे. त्यात गुरुवारच्या घटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच धावपळ उडविली. आमदार मुफ्ती हे दुपारी मनपात गेले असता सुरक्षारक्षकाने त्यांचे वाहन रोखून एंट्री नोंद करण्यास सांगितले. या प्रकाराने आमदारांचा पारा चढला. विशेष म्हणजे संबंधित सुरक्षारक्षकाने आमदारांना ओळखलेच नसल्याच्या मुद्द्याने अधिकच भर पडली. शाब्दिक चकमक उडाली. अखेर लेखाधिकारी राजू खैरनार व सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी प्रवेशद्वाराकडे धाव घेत सुरक्षारक्षकांना समज देत आमदारांची झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.‌ त्यांची समजूत काढत वादावर पडदा टाकण्यात आला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news