आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका | पुढारी

आदित्य ठाकरेंची मला कीव येते : दादा भुसेंची खोचक टीका

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

गेल्या सहा महिन्यांपासून तीन शब्दांच्यापुढे ते बोलत नाहीत. माझ्या आजोबांना चोरल्याचा आरोप ते करतात. आता तर मला त्यांची कीव येते अशी खोचक टीका दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

आदित्य ठाकरे हे नाशिक दौ-यावर असून दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. यासंदर्भात विचारले असता दादा भुसे म्हणाले, त्यांना आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी देखील आव्हान दिले आहे, की आमच्या ग्रामपंचायतीतून तुम्ही निवडणूक लढवून दाखवा अशी बोचरी टीका त्यांनी आदित्य यांच्यावर केली. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, सातत्याने लोकांच्या संपर्कात राहावे लागते. आमचे सरकार उत्तम काम करत आहे. जनता ते बघत आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. उगाच कुठेतरी लोकांची दिशाभूल करायची, मला वाटतं की, राज्यात शेतकरी, कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. त्यावर कुणी बोलत नाही, लोकांना या गोष्टींचा आता वीट आला असल्याचे दादा भुसे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button