Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार | पुढारी

Aditya Thackeray : कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मध्ये आज शिंदे गटाची सभा होणार आहे. वरळीत शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहणार आहेत.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं, त्याचपार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली असावी असे बोलले जात आहे. या सभेवरुन आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघात येऊन सभा घ्यावी लागते यातच माझा विजय असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आज आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा दुसरा दिवस आहे.  नाशिकच्या चांदोरी येथे आजोजित सभेत ते बोलत होते. पाठीवर वार करुन मला विरोधी पक्षात बसवलंय. वरळीतून लढणं जमत नव्हतं तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो. असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. दरम्यान मुख्यमंत्री वरळी येथील सभेत आदित्य ठाकरेंचा कसा समाचार घेतात हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button