एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र | पुढारी

एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

आपण भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानेच विविध षडयंत्र रचून अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधी जे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र होते. न्यायालयाच्या संरक्षणामुळे त्यादिवशी माझी अटक टळली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत सापडले. खडसेंनी आपल्या जावयांच्या अटकेबाबत घडलेली आपबिती सांगितली. मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधीचे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कितीही प्रयत्न केले तरी काहीच मिळत नसल्याने आता मला जेलमध्ये टाकावे यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे.

न्यायालयाच्या संरक्षणामुळे अटक टळली
तसेच, न्यायालयाच्या संरक्षणामुळे माझी अटक केली. मात्र, ईडीने चौकशीसाठी गेलेल्या जावयांना तत्काळ अटक केली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट खडसे करत आहेत. खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झालेला नाही व होऊ दिला नाही, असे वक्तव्य करत मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ खडसे यांनी पुन्हा खंत व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असतानाही उत्तर महाराष्ट्राला संधी मिळालेली नाही. सुरेश जैन असतील अथवा एकनाथ खडसे मात्र आम्हालाही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालीच नाही, हे उत्तर महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button