Nashik : खेडलेझुंगे ग्रामपंचायतीचे इतिवृत्त कळेना, खराब अक्षरामुळे ते वाचणाऱ्यास बक्षीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे या गावच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचणाऱ्या व्यक्तीला लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद घोटेकर यांनी माहिती अधिकारात मागविलेले सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त अशा अक्षरात लिहिले आहे की, त्यावरचे अक्षर कोणालाच वाचता येत नाही. त्यामुळे घोटेकर यांनी समाजमाध्यमांवर अक्षर वाचून दाखवण्यासाठी आवाहन केले होते.
सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त हे सर्वसाधारण सभेचा आरसा समजला जातो. संविधानातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत स्तराला जेवढे महत्त्व आहे तेवढेेच महत्त्व सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या सर्व विषयांचा सार म्हणजे इतिवृत्त असते. हे इतिवृत्त मंजूर करण्याचे अधिकार सरपंच यांना देण्यात आलेेले आहेत. त्यांनीदेखील खेडलेझुंगे गावचे इतिवृत्त कसे मंजूर केले याविषयी चर्चा रंगत आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद घोटेकर यांनी कामासाठी इतिवृत्ताची मागणी केली होती. त्यांनी माहितीच्या अधिकारात संबंधित इतिवृत्त मागवले होते. इतिवृत्त मिळाले, मात्र त्यावरील अक्षर खराब असल्याने वाचण्यास अडचण निर्माण होत आहे.
हेही वाचा :
- Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन
- पक्षाचं काही ठरेना, प्रशासनाचं मात्र ठरलं! कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु
- पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं उपमुख्यमंत्र्याचं आश्वासन; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम