नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दुष्काळी गावे टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ प्रयास हाती घेतले आहे. यामध्ये दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नरेगाच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून सिमेंटचे बंधारे बांधत, यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे सर्व पाणी गावात अडविले जाणार आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी सर्व तालुका उपअभियंता यांची बैठक घेतली असून, त्यांना मिशन भगीरथ प्रयासबाबत सूक्ष्म आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही, धरणे असूनही, काही गावांची तहान टँकरद्वारे भागवावी लागते. फेब्रुवारी महिना संपत नाही तोच, ग्रामीण भागातून टँकरची मागणी सुरू होते. मे महिना असो की, पावसाळा. पाऊस लांबला की गावे आणि वाड्यांवस्त्यांतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. जिल्हा परिषदेच्या मख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी यंदा टँकरमुक्तीचा संकल्प केला असून, त्यासाठी भगीरथ प्रयास मिशन राबविले जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button