‘बीबीसी डॉक्युमेंट्री बंदी’ निर्णयावर सर्वोच्‍च न्‍यायालयात होणार सुनावणी

सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र)
सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावरील बीबीसीच्‍या डॉक्युमेंट्रीवर (माहितीपट) बंदी घालण्‍याच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकणी ज्‍येष्‍ठ वकील एम.एल. शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. त्‍यांच्‍या याचिकेवर आता ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ( BBC documentary  )

BBC documentary :  तत्‍काळ सुनावणीची याचिकाकर्ते शर्मांची मागणी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २१ जानेवारी रोजी बीबीसीच्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावरील डॉक्युमेंट्रीवर बंदी  घालण्‍याचा आदेश दिला होता.या निर्णयावर तत्‍काळ सुनावणी व्‍हावी, अशी मागणी याचिकाकर्ते एम.एल. शर्मा यांनी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडीपाठासमोर आज ( दि. ३० ) केली. या याचिकेवर ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होईल, असे सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले.

2002 च्या गुजरात दंगल संदर्भातील वस्‍तुनिष्‍ठ माहिती, बातम्या आणि अहवाल पाहण्याचा भारतीय राज्‍यघटनेतील कलम 19(1) आणि (2) नुसार अधिकार आहे की नाही, याबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्णय द्‍यावा, अशी मागणी एम.एल. शर्मा यांनी दाखल केलेल्‍या याचिकेतून करण्‍यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीमधील माहिती वस्‍तूनिष्‍ठ आहे. याचा उपयोग पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावाही याचिकेतून करण्‍यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news