नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली. लॉजचालकांकडून नियमांचे पालन होते की नाही याची शहानिशा पोलिसांनी केली. दरम्यान याबाबत त्रंबकेश्वर पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी नियमित कारवाई असल्याचे सांगितले. दरम्यान कारवाईमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा:
- पुणे : टोमॅटो, काकडी, फ्लॉवर स्वस्त; फळभाज्यांची आवक स्थिर
- नगर अर्बन बँकेस सहकार्य करू; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही
- ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज