Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ | पुढारी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये खळबळ

जळगाव : भुसावळ शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी १०. ३५ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळसह लगतच्या कंडारी रायपुर भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात शुक्रवारी सकाळीच भूकंपाचे झटके बसले आहेत. भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी १०.३५ च्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले आहेत. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भूकंपाचे धक्के बसल्याने काहीसे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काहीशी खळबळ उडाली आहे. नाशिक शहरापासून २७८ किलोमीटर अंतरावर म्हणजेच भुसावळ, सावदा परिसरात भारतीय प्रमाण वेळ सकाळी १०.३५ वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नाशिक केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवण्यात आली आहे. भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत. दरम्यान, भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हतनूर धरणाला काहीही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button