Stock Market Today | सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला, बँकिंग शेअर्संना सर्वाधिक फटका | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला, बँकिंग शेअर्संना सर्वाधिक फटका

Stock Market Today : जागतिक नकारात्मक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा तसेच बँकिंग शेअर्समधील घसरणीचा फटका शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराला बसला. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी खाली आला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ७५० अंकांनी घसरून ६० हजारांखाली आला. तर निफ्टी १७,७०० पातळीवर व्यवहार करत आहे. आज सुरुवातीला सेन्सेक्सची झालेली घसरण ही १.२५ टक्के आहे. तर निफ्टी १.१४ टक्क्यांनी खाली आला.

सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स सर्वाधिक २ टक्क्यांपर्यंत घसरले. ॲक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, कोटक बँक आणि पॉवर ग्रिड हे देखील घसरले. टाटा मोटर्स, एम अँड एम, आयटीसी, टाटा स्टील, मारुती आणि सन फार्मा यांचे शेअर्स ‍वधारले आहे.

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक गुरुवारी वधारुन बंद झाले होते. यामुळे शुक्रवारी आशियाई बाजारात तेजी दिसून आली. पण भारतीय शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड दिसून येत आहे. (Stock Market Today)

 हे ही वाचा :

Back to top button