'Pathan'ने पुसला बॉलिवूडवरचा कलंक; कमाईच्या त्सुनामीत हॉलिवूड गारद | पुढारी

'Pathan'ने पुसला बॉलिवूडवरचा कलंक; कमाईच्या त्सुनामीत हॉलिवूड गारद

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रतिक्षीत चित्रपट ‘Pathan’ ने बॉक्‍स  ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. २०२२ या वर्षात बॉलिवूडवर जणू कलंक लागला होता. कारण या वर्षी प्रदर्शित झालेल्‍या अनेक चित्रपटांनी खास कमाई केली नव्हती. मात्र या वर्षीच्या सुरूवातीलाच पठाण (Pathan) चित्रपटाने एकदम धमाकेदार सुरूवात केल्‍याने यंदाचे वर्ष बॉलिवूडसाठी खास राहील आणि पुन्हा एकदा बॉलिवूडचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर बक्‍कळ कमाई करतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. अभिनेता शाहरूख खान खूप दिवसानंतर पठाण बनून काय आला आणि त्‍याने रसिकांची मने जिंकली. बॉक्‍स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार ‘Pathan’ ने दुसऱ्या दिवशी जवळपास ७० कोटींची कमाई केली आहे. त्‍यामुळे या चित्रपटाने दोन दिवसांत १०० कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे.

‘Pathan’ ने पहिल्‍या दिवशी ५५ कोटी रूपये आपल्‍या नावे केले होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली. चित्रपटाने आतापर्यंत १२५ कोटी रूपये गल्ला जमवला आहे. दरम्‍यान, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांमध्ये या (Pathan) चित्रपटाला प्रेक्षकांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे. ज्‍यामुळे या चित्रपटाची एका दिवसाची कमाई तब्‍बल १०० कोटींचा आकडा गाठू शकते.

‘पठान’ मध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम सोबतच डिंपल कपाड़िया आणि आशुतोष राणा यांच्या देखील महत्‍वाच्या भूमीका आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्‍या ‘पठाण’ (Pathan) ने एक तऱ्हेने बॉलिवूडवरचा कलंक धुवून टाकला आहे. हिंदी प्रदर्शनाची हा पहिला चित्रपट आहे ज्‍याने अवघ्‍या दोन दिवसांमध्ये १२५ कोटी रूपयांचा गल्‍ला जमवला. जगभरातील ८ हजार स्‍क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला. ज्‍यामध्ये ५,५०० स्‍क्रीन भारतात तर २,५०० स्‍क्रीन विदेशात मिळाले. ज्‍याचा परिणाम या चित्रपटाला बक्‍कळ कमाई करण्यात झाल्‍याचे दिसून येते.

 

शाहरूख खानचा २०१८ साली झिरो हा चित्रपट आला होता, त्‍यानंतर शाहरूख खान ‘पठान’ चित्रपट घेऊन चाहत्‍यांसमोर आला. शाहरूख खानच्या (Pathan) येणाऱ्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर, दिग्‍दर्शक एटली यांच ‘जवान’ चित्रपटात तो पुन्हा एकदा दिसणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान अॅक्‍शन सिन करताना दिसणार आहेत. यासोबतच तापसी पन्नू सोबत तो ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे. ज्‍याचे दिग्‍दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button